Close

हर घर तिरंगा

हर घर तिरंगा उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 11 ते 17 ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण जिल्हाभर “हर घर तिरंगा” हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे..

राष्ट्रध्वज कशाचा असावा

  • हाताने कातलेला
  • हाताने विणलेला
  • मशीनद्वारे तयार केलेला
    ( सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादी )

राष्ट्रध्वजाची उभारणी कुठे करता येईल

  • शासकीय / निमशासकीय इमारत
  • खाजगी आस्थापना इमारत
  • सहकारी / शैक्षणिक संस्था इमारत
  • नागरिकांनी स्वत:च्या घरावर (स्वयंस्फूर्तीने)
  • सहकारी / स्थानिक स्वराज्य संस्था
  • पोलीस यंत्रणा व आरोग्य केंद्र
  • शाळा / महाविद्यालय व परिवहन
  • रास्तभाव धान्य दुकाने