हिंगोली हे महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या उत्तर भागात वसलेले आहे. हिंगोलीच्या सीमा उत्तरेला अकोला आणि यवतमाळ, पश्चिमेला परभणी आणि दक्षिण-पूर्व बाजूने नांदेडने वेढलेल्या आहेत. 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून जिल्हा अस्तित्वात आला.
जवळचे रेल्वे स्टेशन : हिंगोली.
सर्वात मोठे रेल्वे स्टेशन: परभणी जे दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबादला थेट ट्रेनने जोडलेले आहे.
परभणीपासून रस्त्याने अंतर: 80 किमी.
अकोल्यापासून रेल्वेने अंतर: 115 किमी.
जवळचे विमानतळ : औरंगाबाद
औरंगाबाद पासून रस्त्याने अंतर: 230 किमी