बंद

ट्रॅव्हल ई-पाससाठी अर्ज करा

ट्रॅव्हल ई-पाससाठी अर्ज करा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
ट्रॅव्हल ई-पाससाठी अर्ज करा

हिंगोली जिल्ह्यातील Containment zone च्या बाहेर असणारे लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी.
माहिती भरताना सोबत खालील कागदपत्रे Upload करावीत.

1) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र 200 KB size पर्यंत

2) स्वतःचा अलीकडच्या काळातील फोटो 200 KB size पर्यंत
हिंगोली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा परराज्यात जाण्यासाठी http://covid19.mhpolice.in/ लिंकचा वापर करावा. यात आपली संपूर्ण माहिती भरून सबमिट करावे.
आपण भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून तात्काळ ऑनलाइन पास देण्याची कारवाई करण्यात येईल. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत केली जाईल.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की याव्यतिरिक्त कोठेही पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

प्रथम आपला फॉर्म नीट भरला असल्याबाबत खात्री करावी तरीदेखील याबाबत अडचण आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करू शकतात:
02456 222560

याशिवाय कोणतेही राज्य किंवा विभागीय किंवा जिल्हा नोडल अधिकारी यांना फोन करण्याची किंवा मेसेज करण्याची आवश्यकता नाही.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
तथा जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली.

ट्रॅव्हल ई-पाससाठी अर्ज करा क्लिक करा

02/05/2020 01/06/2020 पहा (92 KB)